अखेर अँमेझॉन जागे झाले | मराठीचा मान राखणार | Raj Thackeray | Amazon | Maharashtra News

2021-09-13 548

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी आवाज उठवल्यानंतर आता अॅमेझॉनला जाग आली. जेफ बेझॉस या अमेरिकन उद्योगपतीच्या मालकीच्या अॅमेझॉनने भारतात आल्यानंतर आता कुठे मराठी भाषेला मान्यता दिली. त्यामुळे लवकर तुम्ही मराठी भाषेत ऑनलाईन शॉपिंग करु शकणार आहात. अॅमेझॉनच्या वेबसाईटवर हिंदी आणि इंग्रजीसह तामिळ, तेलूगू, कन्नड, मल्ल्याळम या भारतीय भाषांचा समावेश आहे. त्यात मराठीचा समावेश नव्हता. वेबसाईटवर मराठी नसल्याने ती उपलब्ध करुन देण्यासाठी मनसेने आक्रमक भूमिका घेतली होती. मनसे नेते अखिल चित्रे यांनी पदाधिकाऱ्यांसह अॅमेझॉनच्या कार्यालयाला भेट दिली होती. यावेळी वेबसाईटवर मराठी भाषेचा समावेश करावा यासाठी त्यांनी सात दिवसांची मुदत दिली होती. वेबसाईटवर मराठीचा समावेश सात दिवसांच्या आत केला नाही तर आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला होता.
मनसेच्या या मागणीची अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी दखल घेतली आहे. अॅमेझॉनच्या प्रतिनिधीने मराठी भाषेच्या या मागणीवर आपण सकारात्मक विचार करत असल्याचा एक ई-मेल मनसेला पाठवला आहे

#lokmat #JeffBezos #Amazon #Rajthackeray #Marathibhasha
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat